आमच्याविषयी

२०१८ साली माननीय आमिर खान, किरण राव व सत्त्यजीत भटकळ यांच्या पुढाकाराने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेची कूण कूण लागली , स्पर्धेत भाग घ्यायचा की नाही याचा आम्ही विचार करत होतो कारण स्पर्धेमध्ये श्रमदान ४५ दिवस करावयाचे होते. गावाची एकी करून काम करावयाचे होते. लोक येतील की नाही याची शंका होती. परंतु माढ्याचे सभापती मा. रणजीत भैया शिंदे यांनी बळ दिले व स्पर्धेत भाग घेण्यास भाग पाडले.

सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आव्हान दिले मग आम्ही फॉर्म भरला व गावातील युवकांनी ट्रेनिंग पूर्ण केले मग काय ४५ दिवसात दररोज ६.३० वाजता गावातील लोक श्रमदानासाठी एकत्र येऊ लागले.

जैन संघटनचे शांतिलाल मुथा यांनी गावातील ओढा खोलीकरणासाठी २ पोकेलेन व १ जेसीबी आमचा उत्साह बघून दिले. मशीन डिझेलसाठी गावकऱ्यांनी लोक वर्गणी गोळा केली २५००००/- लोक वर्गणी गोळा झाली. तेही पैसे संपले नंतर आम्ही माढ्याचे आमदार माननीय बनबनदादा शिंदे यांना भेटलो त्यांनी आम्हाला आणखी बळ दिले , तुम्हाला डिझेल कमी पडू दिले जाणार नाही. दादांनी आम्हाला २२५०००/- रुपयांचे डिझेल दिले

नंतर मा. रणजीतसिंह शिंदे यांनी प्राज इंडस्ट्री पुणे यांच्याकडून ५००००/-
रुपये डिसेल साठी मिळवून दिले व बबनराव शुगर अलाईड लिमिटेड यांचा ५०० कर्मचाऱ्यांच्या स्टाफ एक दिवस श्रमदानासाठी लोंढेवाडी येथे आणला व रोटरी क्लब माढा यांनी सुद्धा दोन श्रमदान केले. महिला राष्ट्रवादी येथील रस्त्याचा माती टाकून सुधार दोन दिवस श्रमदान केले. महिला राष्ट्रवादी सोलापूर यांनी देखील एक दिवस श्रमदान करून आम्हाला मदत केली.

माळशिरस तहसिलदार पडदुने चौधरी व नामवंत प्रसिद्ध डॉक्टर डॉ. संतोष गुजरे यांनी पण आमचा उत्साह पाहून १० दिवस J.C.B. खोलीकरणासाठी दिले. आम्ही ४ किमी ओढ्याचे खोलीकरण रुंदीकरण केले सीसीटी, डीप सीसीटी, माती नाला बांध अशी अनेक कामे पाणी जिरवण्यासाठी केले.

आम्ही त्याकाळात शासकीय योजनेत ओढ्यावर साखळी पद्धतीचे सात बंधारे नवीन बांधलेल्या या कामामुळे आमच्या गावाला पाणी फाउंडेशन ने पहिला क्रमांकाचे बक्षीस १५०००००/- रुपये जाहीर झाले परंतु पाऊस पडलेला नव्हता आम्ही पावसाची वाट पाहत होतो एक दिवस उजाडला रात्री इतका पाऊस पडला की गावाचे रुपडे बदलले व सर्व बंधारे ओव्हर फ्लो झाले.

गावातील महिलांनी पाण्याचे पूजन केले गावातील लोकांनी श्रमदान केलेला आनंद झाला. नंतर गावाला स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला गावाला रोडच्या दोन्ही बाजुला झाडे लावण्यात आली. त्याला ड्रिप करण्यात आली मग गावातील युवकांनी ठरवले की आणखी झाडे लावायची देशी जातीचे झाडे देवराई पुणे येथून मोफत दिली त्याला वर्गणी गोळा करून तारेचे कंपाउंड केले व २ एकर जागेला ड्रिप करण्यात आली आहे.

गावातील गार्डनमध्ये सर्व देशी प्रकारची वड, उंबर, पाखर,पिंपळ, बेल, कदंब, शमी, आपटा, चिंच, चाफा, कडुनिंब, कांचन, सप्तपर्णी, करंज, वरवंटा, जरुल, अमलताश, नांद्रुक, शिसव, शिरीष, पारिजातक, बकुळ, आवळा, बांबू पिवळा, रक्तचंदन, सिल्वर ओक, आंबा, कुसुंब, बदाम, अशोक, मोहा, टेम्भूर्णी, खिरणी, शिवण, जांभूळ, नारळ, ताडफळ, सीताफळ, रामफळ, कवठ, फणस, लिंबू, पेरू, चारोळी असे विविध जातीची फक्त देशी जातीची झाडे आहेत.

आमचा असा मानस आहे, ग्रामीण भागातील युवकांना रोजगार निर्मिंती खेडेगाव कृषी ग्रामीण पर्यटन संकल्पना रुजावी, खेड्यातील लहान मुलांना खेळण्यासाठी सुंदर असा बगीचा असावा. म्हणून सोनई कृषी पर्यटन याची सुरवात केली. या पर्यटनामध्ये साधारण ५००० देशी वृक्षाची लागवड करण्यात आली आहे.

लोंढेवाडी या गावामध्ये नागरिकांना गरम पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच गावाचा सर्व पाणीपुरवठा योजना ही सोलर वर चालवली जाते. आमचा असा मानस आहे, ग्रामीण भागातील युवकांना रोजगार निर्मिंती खेडेगाव कृषी ग्रामीण पर्यटन संकल्पना रुजावी, खेड्यातील लहान मुलांना खेळण्यासाठी सुंदर असा बगीचा असावा. म्हणून सोनई कृषी पर्यटन याची सुरवात केली. या पर्यटनामध्ये साधारण ५००० देशी वृक्षाची लागवड करण्यात आली आहे.

गावकर्यांना शेंद्रीय शेतीचे महत्व कळावे म्हणून गावामध्ये विषमुक्त शेती या साठी गटशेती सुरु केली आहे. गावामध्ये कुऱ्हाड बंदी करण्यात आली आहे तसेच गावामध्ये पर्यावरणाचा विचार करून प्लास्टिक बंदी केली आहे. गावालगतच्या नदी पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी गावांनी वाळू उपसा बंदीचा ठराव देखील केला आहे.

तसेच ओढा खोलीकरण केले आहे. सात बंधारे देखील बांधले आहेत. पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरण्यासाठी ठिकठिकाणी रिचार्ज शाफ्ट तयार केले आहे.

ग्रामपंचायत सदस्य

सौ. सविता सुरेश लोंढे

सदस्य, ग्रामपंचायत लोंढेवाडी

श्री. सत्यम् संतोष लोंढे

सदस्य, ग्रामपंचायत लोंढेवाडी

सौ. बिगुलानी रामजन तांबोळी

सदस्य, ग्रामपंचायत लोंढेवाडी

सौ. स्वप्नाली शंकर मुलुक

सदस्य, ग्रामपंचायत लोंढेवाडी

सौ. अमरजा किरण लोंढे

सदस्य, ग्रामपंचायत लोंढेवाडी

सौ. आरती शाहाजी शिंगाडे

सदस्य, ग्रामपंचायत लोंढेवाडी

श्री. सुधाकर अभिमन्यू गव्हाणे

ग्रामविकास अधिकारी, लोंढेवाडी