सदस्य, ग्रामपंचायत लोंढेवाडी
२०१८ साली माननीय आमिर खान, किरण राव व सत्त्यजीत भटकळ यांच्या पुढाकाराने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेची कूण कूण लागली , स्पर्धेत भाग घ्यायचा की नाही याचा आम्ही विचार करत होतो कारण स्पर्धेमध्ये श्रमदान ४५ दिवस करावयाचे होते. गावाची एकी करून काम करावयाचे होते. लोक येतील की नाही याची शंका होती. परंतु माढ्याचे सभापती मा. रणजीत भैया शिंदे यांनी बळ दिले व स्पर्धेत भाग घेण्यास भाग पाडले.
सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आव्हान दिले मग आम्ही फॉर्म भरला व गावातील युवकांनी ट्रेनिंग पूर्ण केले मग काय ४५ दिवसात दररोज ६.३० वाजता गावातील लोक श्रमदानासाठी एकत्र येऊ लागले.
जैन संघटनचे शांतिलाल मुथा यांनी गावातील ओढा खोलीकरणासाठी २ पोकेलेन व १ जेसीबी आमचा उत्साह बघून दिले. मशीन डिझेलसाठी गावकऱ्यांनी लोक वर्गणी गोळा केली २५००००/- लोक वर्गणी गोळा झाली. तेही पैसे संपले नंतर आम्ही माढ्याचे आमदार माननीय बनबनदादा शिंदे यांना भेटलो त्यांनी आम्हाला आणखी बळ दिले , तुम्हाला डिझेल कमी पडू दिले जाणार नाही. दादांनी आम्हाला २२५०००/- रुपयांचे डिझेल दिले
नंतर मा. रणजीतसिंह शिंदे यांनी प्राज इंडस्ट्री पुणे यांच्याकडून ५००००/-
रुपये डिसेल साठी मिळवून दिले व बबनराव शुगर अलाईड लिमिटेड यांचा ५०० कर्मचाऱ्यांच्या स्टाफ एक दिवस श्रमदानासाठी लोंढेवाडी येथे आणला व रोटरी क्लब माढा यांनी सुद्धा दोन श्रमदान केले. महिला राष्ट्रवादी येथील रस्त्याचा माती टाकून सुधार दोन दिवस श्रमदान केले. महिला राष्ट्रवादी सोलापूर यांनी देखील एक दिवस श्रमदान करून आम्हाला मदत केली.



